International Seminar on Skin and Hair

 On March, 07/ 2010 an International Seminar on Hair and skin care. was organized by International Academy of Ayurved, Pune. The Venue was S.M. Joshi Socialist Foundation Hall.

 Registration of the delegates started at 8 a.m. and Dr. Yogesh Badwe and his students from Bharati Vidyapeeth Ay. College organized it very smoothly. More than 350 P.G. Physicians from Tilak Ayurveda College, Ashtang Ayurveda College, Bharati Vidyapeetha Ay. College, SS Ay. College, Hadpsar and DY Patil Ay. College, College of Ayurved and Research Centre Akurdi and BSDT’S Ayurved Reseacrch centre, Wagholi had registered along with many IAA members.

 

The hall was nicely decorated by Dr. Priya Deshpande, Dr. Swati Chobhe, Dr. Nanadan Lele and Dr. Ila Bhor with banners of IAA.

After Dhanvantari poojan and prayer, the inauguration of the seminar was done at 8.30 in the morning.  Following dignitaries were present on the Dias - Prof. Subhash Ranade, Chairman, IAA, Dr. Sunanda Ranade, Dr. Avinash Lele, Dr. Sudhakar Mhaskar, Dr. Shashikant Patwardhan and Prof. Manfred Krames from Germany.

 Dr. Gunvant Yeola, secretary of IAA explained the purpose of the seminar and Dr. Avinash Lele gave welcome speech. Prof. Subhash Ranade introduced Chief Guest – Prof. Manfred Krames and then he declared the seminar open. Later on Prof. Subhash Ranade introduced Special Guest, Dr. Sudhakar Mhaskar, head technology of Marico, India and then he delivered his lecture on the “Relevance of modern research on coconut oil”.

The first scientific session was conducted by Dr. Mihir Hajarnavis and Dr.Manjusha Karakare. For this session, Dr. R.N. Gangal, principal of Tilak Ayurveda college, Dr. Vijay Bhandare, Vice Principal of Ashtang Ayurveda college and Dr. Prashant Dalvi, Vice Principal of S.S.Ayurveda college, Hadapsar were appointed as the moderators. Dr. Sachin Kuber and Dr. Shalini Sarwade welcomed the guests. During this session following lectures were presented – Dr. Mukund Erande talked about the Sharira of Hair and Skin, Noted dermatologist, Dr. Amit Kelkar presented his views on diagnosis and treatment of various hair and scalp diseases, Vaidya Nandan Lele talked about the qualities and usefulness of coconut oil described in various Ayurvedic Texts. Dr. Vaishali Gode, chief research officer of Marico India presented her research on benefits of coconut oil for hair. Later on Dr. Mahesh Patil and Dr. Ajit Mandlecha gave wonderful demonstration about the Marma massage as well as the latest Shirodhara machine developed by them.

There were more than 63 posters presented by the P.G. Physicians of various Ayurvedic Colleges in and around Pune. Dr. Sachin Sarpotdar, Dr. Rajan Rawat, Dr. Vinay Huilgolkar worked as examiners to evaluate the best poster for hair and skin problems. Out of all these they gave prizes to following doctors – 1 st prize -Dr. Ruta Kadam (B.V.AY.college), 2 nd prize Dr. Pushpanjali Kumbhar (S.S.Ay. college Hadapsar) –3 rd prize was given to Dr. Amol Bansode (S.S.Ay.college, Hadapsar) and Dr. Preeti Deshmukh (D.Y.Patil Ay.college),

 The second scientific session was conducted by Dr. Manjusha Karkare

In this session, the questions from the audience were answered by the panel of experts. Dr. Avinash Lele chaired the session and Dr. Nandan Lele, Dr. Mukund Erande, Dr. Vaishali Gode, Dr. Mahesh Patil and Dr. Ajit Mandlecha explained the questions on scientific lectures.

Then the publication of the book “ Dainandin Arogya Gatha” written by Dr. Rajendra Deshpande, Dr. Sachin Sarpotdar, Dr. Swati Chobhe and edited by Prof. Subhash Ranade was done at the hands of Shri Ranjit Puranik of Shri Dhootpapeshwar Co. Ltd. Mumbai. Dr. Sachin Sarpotdar explained briefly the usefulness of the book for the common people. The book contains 365 articles one for each day having topics like how to prevent diseases by observing proper daily and seasonal regimen described in Ayurveda, qualities of various foods and herbs for keeping health and achieving longevity.

Later on Dr. Manfred Krames gave speech on Superiority of Ayurveda over other traditional Medical Systems.” He narrated that Ayurveda is now completely emerging as the complete system of medicine and it is believed and followed by millions of western people and enthusiasts worldwide.

 This was followed by the felicitation function in which Prof. Subhash Ranade and Dr. Sunanda Ranade were felicitated for their 30 years propagation across the world. Shri Ranjit Puranik talked about the efforts done by Ranade’s in the academic field by writing more than 140 books on various topics of Ayurveda and visiting all the continents for the propagation of Ayurveda in the last 30 years.

After the ceremony delicious lunch was offered to all the guests.

त्वचा व केश या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद

पुणे येथील आंतरराष्ट्रीय अकॅडमी , आयुर्वेद यांचे तर्फे दिनांक ७ मार्च रोजी एस.एम.जोशी हॉल               ( समाजवादी फौंडेशन ) येथे केश व त्वचा या विषयावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.  

परिसंवादासाठी आलेल्या सभासदांची नावनोंदणी सकाळी ८ वाजता सुरु झाली. डॉ.योगेश बडवे आणि त्यांचे भारती विद्यापीठ येथील विद्यार्थ्यांनी ही जवाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली.परिसंवादासाठी ३५० हून जास्त तज्ञ वैद्यांनी नावनोंदणी केली त्यामध्ये टिळक आयुर्वेद कॉलेज,भारती विद्यापीठ कॉलेज ,साने गुरुजी आयुर्वेद कॉलेज हडपसर ,डी.वाय.पाटील कॉलेज ,आयुर्वेद महाविद्यालय व अनुसंधान केंद्र ,आकुर्डी ,बी.एस.डी.टी चे आयुर्वेद अनुसंधान केंद्र ,वाघोली  तसेच आय .ए.ए .च्या सभासदांचा समावेश होता.

स.एम.जोशी हॉल ची  अंतर्गत  सजावट डॉ.प्रिया देशपांडे व डॉ.स्वाती चोभे,डॉ. नंदन लेले  आणि  डॉ . इला  भोर   यांनी आय .ए.ए चे बानर व मरीको च्या जाहिराती लावून अतिशय सुंदर केली होती.

धन्वंतरीच्या पूजन आणि स्तवनानंतर परिसंवादाचे उद्घाटन सकाळी ८.३० वाजता झाले. अध्यक्षस्थानी खालील मान्यवर उपस्थित होते- प्रा.सुभाष रानडे,चेयरमन ,आय.ए.ए.,डॉ.सुनंदा रानडे,डॉ.अविनाश लेले ,डॉ.सुधाकर म्हसकर,डॉ.शशिकांत पटवर्धन व प्रा.मानफ्रेद क्रेम्स ( जर्मनी).

आय.ए.ए.चे सेक्रेटरी डॉ.गुणवंत येवला यांनी परिसंवादाचा उद्देश सभासदांपुढे मांडला .डॉ.अविनाश लेले यांनी स्वागताचे भाषण केले.प्रा.सुभाष रानडे यांनी प्रमुख पाहुणे डॉ.मानफ्रेद क्रेम्स यांची श्रोत्यांना ओळख करून दिली .प्रा.मानफ्रेद क्रेम्स यांनी औपचारिकरित्या संमेलनाचे उद्घाटन केल्याचे जाहीर केले. त्यांनतर प्रा.रानडे यांनी विशेष पाहुणे डॉ.सुधाकर म्हसकर ( मरीको , मुख्य   तकनीकी संचालक) यांचे स्वागत केले व त्यांची माहिती श्रोत्यांना दिली.डॉ.सुधाकर म्हसकर यांनी " नारळाच्या तेलावरील आधुनिक उपयोगी अनुसंधान"या विषयावर माहितीपर व्याख्यान दिले.

  प्रथम शास्त्रीय परिसंवादाचे सूत्रसंचालन डॉ.मिहीर  हजारनावीस व डॉ.करकरे यांनी केले .या शास्त्रीय परिसंवादासाठी मोडरेतर ( तपासनीस ) म्हणून टिळक आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश गांगल,अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.विजय भंडारे ,भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रशांत दळवी यांनी काम पहिले.डॉ.सचिन कुबेर व डॉ.शालिनी सरवदे यांनी सर्व पाहुणे व सभासदांचे स्वागत केले.शास्त्रीय परिसंवादामध्ये खालीलप्रमाणे व्याख्याने झाली.

·  केश व त्वचा शारीर - डॉ.मुकुंद एरंडे.

·  केश विकार व शिरोत्वचा विकार -  डॉ.अमित केळकर 

·  नारिकेल तेल-गुण व कर्म ( आयुर्वेद संहीतानुसार)-डॉ.नंदन लेले 

·  नारिकेल तेलाचा केसांवरील परिणाम व उपयोग -डॉ.वैशाली गोडे ,प्रमुख अनुसंधान अधिकारी, मरीको 

·  मर्म मसाज व नवीन शिरोधारा यंत्राची ओळख - डॉ .महेश पाटील ,डॉ.अजित मंडलेचा

पुण्यातील व पुण्याजवळील आयुर्वेद महाविद्यालयातील  जवळपास ५० पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ६३  हून अधिक पोस्टर्स तयार करून परिसंवादात सादर केली. डॉ . सचिन  सरपोतदार , डॉ . राजन  रावत , डॉ . विनय  हुइलगोलकर यांनी पोस्टर्स ची तपासणी करून केश व त्वचेच्या विकारांवर  सर्वोत्तम पोस्टर्सची निवड केली. खालीलप्रमाणे सर्वोत्तम निवड केलेले विद्यार्थी -

1.           प्रथम पारितोषिक : डॉ . ऋता  कदम  (बी .वी .आयुर्वेदिक . कॉलेज ), 

2.           द्वितीय  पारितोषिक डॉ . पुष्पांजली  कुंभार  (एस .एस .आयुर्वेदिक . कॉलेज हडपसर ) 

3.            तृतीय  पारितोषिक  ( विभागून ) डॉ . अमोल  बनसोडे   (एस .एस .आयुर्वेदिक . कॉलेज हडपसर )  आणि  डॉ . प्रीती  देशमुख  (दि .वाय .पाटील आयुर्वेदिक कॉलेज )

दुसर्या  शास्त्रीय परिसंवादाची प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ.मंजुषा करकरे यांनी केले 

या सत्रामध्ये श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तज्ञ वैद्यांनी दिली. डॉ.अविनाश लेले यांनी या सत्राचे सूत्रसंचालन तसेच मार्गदर्शन केले .डॉ . नंदन  लेले , डॉ . मुकुंद  एरंडे , डॉ . वैशाली  गोडे , डॉ . महेश  पाटील  आणि  डॉ . अजित  मंडलेचा यांनी शास्त्रीय व्याख्यानांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. 

यानंतर श्री धूतपापेश्वर कंपनी ,मुंबई चे संचालक श्री . रणजीत पुराणिक यांचे शुभहस्ते " दैनंदिन आरोग्य गाथा  " या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. सदर ग्रंथाचे लेखक  डॉ . राजेंद्र  देशपांडे , डॉ . सचिन  सरपोतदार , डॉ . स्वाती  चोभे आहेत  आणि  या ग्रंथाचे संपादन प्रा . सुभाष  रानडे यांनी केले आहे.

मुख्य वैशिष्ट्ये :-

यानंतर डॉ.मान्फ्रेद क्रेम्स यांनी " इतर वैद्यकीय शास्त्रांवर आयुर्वेदाची उच्चतमता " या विषयावर व्याख्यान  दिले. ते म्हणाले की ' आयुर्वेद शास्त्र प्रणाली ही एक परिपूर्ण वैद्यकीय चिकित्सा प्रणाली म्हणून अस्तित्वात येत असून पाश्चिमात्य देशांमध्ये करोडो लोक तसेच जिज्ञासू व्यक्ती आयुर्वेदाच्या सिद्धांतांचे परिशीलन करत आहेत.

व्याख्यानानंतर  प्रा.सुभाष रानडे व सौ . डॉ. सुनंदा रानडे यांचा " जगभरातील आयुर्वेद प्रचार व प्रसार" याला ३० वर्षे पूर्ण झाली म्हणून सत्कार करण्यात आला. श्री रणजीत पुराणिक यांनी प्रा.सुभाष रानडे यांच्या शैक्षणिक कारकिर्दीची श्रोत्यांना ओळख करून दिली. ते म्हणाले की सर्व संसार सांभाळून या शिक्षण तपस्वींनी आयुर्वेदावर १४० हून जास्त पुस्तके लिहिली आहेत तसेच आयुर्वेदाच्या प्रसारासाठी गेल्या तीस वर्षांत त्यांनी जगातील जवळपास सर्व खंडांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी आत्तापर्यंत ५५ हून अधिक देशांत आयुर्वेदाचा प्रचार केला आहे.

या कार्यक्रमानंतर सर्व पाहुण्यांना स्वादिष्ट मेजवानीचे आयोजन केले होते . सर्व पाहुण्यांना स्वादिष्ट जेवण देण्यात आले. 

From International Seminar on Hair and Skin Care


Event was attended by more than 350 ayurvedic physicians across Maharashtra.